➖प्रधानमंत्री जन धन योजना➖
भारतात राहणारा 10 वर्षांवरील कोणताही नागरिक जनधन खातं सुरु करु शकतो.
नागरिकांनी जर जन-धन योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते नसतील तर जन-धन खाते तयार करण्यासाठी फोर्म भरा.
जनधन खात्याचे फायदे -- जनधन खात्यात जमा असलेल्या रकमेवर व्याजाची सुविधा
- खातेधारकाला निशुल्क मोबाईल बँकिंगची सुविधा मिळते
- जनधन खातेधारक आपल्या खात्यातून 10 हजार रुपयांचं ओवरड्राफ्ट करु शकतो. म्हणजे खात्यात पैसे नसतानाही 10 हजार रुपये काढता येऊ शकतात. परंतु ही सुविधा खातं सुरु केल्यानंतर काही महिन्यांनंतरच मिळते.
- या जनधन खात्याद्वारे निशुल्क दोन लाख रुपयांचा अपघाती विमादेखील मिळतो.
- यात 30 हजारांचाही विमा मिळू शकतो. खातेधारकाच्या निधनानंतर त्या व्यक्तीच्या नॉमिनीला ही रक्कम मिळू शकते.
- या खात्यात कोणताही मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची आवश्यकता नाही. परंतु चेकबुकची सुविधा घेतल्यास मिनिमम बॅलेन्स ठेवणं गरजेचं आहे.
जनधन खातं सुरु करण्यासाठी आवश्यक कागदपत्र -
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- वोटर आयडी कार्ड
- पासपोर्ट
- मनरेगा जॉब कार्ड
👉 प्रधानमंत्री
जन-धन योजनेअंतर्गत ग्राहक सरकारी बँकांप्रमाणेच, खासगी बँकांमध्येही जनधन अकाऊंट सुरु करु शकतात. जर
ग्राहकाच बचत अकाऊंट असल्यास त्यालाही जनधन खात्यामध्ये बदलता येऊ शकते. जनधन खातं
कसं सुरु करायचं आणि बचत खातं जनधन खात्यात कशाप्रकारे बदलायचं या दोन्ही
प्रक्रिया सोप्या आहेत.
👉 BOI (बँक ऑफ इंडिया), HDFC बँक, SBI बँक, CBI (सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया), ICICI बँक, AXIS एक्सिस बँक,कोटक महिंद्रा बँक या सरकारी आणि प्रायव्हेट बँकांमध्ये जनधन अकाऊंट सुरु करता येऊ शकतं.
👉 नजीकच्या शाखेमध्ये भेट देऊन माहिती जाणून घेऊ शकता. प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या माध्यमातून अनेक लाभदायक योजना नागरिकांसाठी खालीलप्रमाणे:
🔘 अटल पेन्शन योजना
🔘 प्रधानमंत्री मुद्रा योजना
🔘 सुकन्या समृद्धी योजना
🔘 प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
🔘 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
दिलेल्या योजनांची सविस्तर माहिती खालील प्रमाणे:
🔘 अटल पेन्शन योजना
आता देशात प्रथमच अटल पेन्शन योजनेद्वारे प्रत्येक गृहिणीला मिळेल. पेन्शनचा हक्क.
ज्यांचे वय १८ (18) ते ४० (40) वर्ष आहे अशा सर्व बचत बँक खाते धारकांसाठी, मासिक पेन्शन तुमच्या योगदानावर अवलंबून असेल.हि एक निवृत्ती वेतन योजना म्हणून सुद्धा ओळखली जाते.
म्हणजे 18 व्या वर्षी योजनेद्वारे लाभ घेत असाल तर
42 रु पासून तर 210 रु दरमहा पर्यंत योगदान केल्यास
1000 रु पासून 5000रु पर्यंत आयुष्यभर मासिक पेन्शनचा लाभ
60 वर्ष वयानंतर तुम्हाला आणि तुमच्या पश्यात तुमच्या जीवनसाथीदाराला मिळेल दरमहा एक निश्चित पेन्शनची रक्कम आणि जीवनसाथीदाराच्या पश्यात नामनिर्देशित व्यक्तीला मिळेल 1,70,000 रु - 8,50,000 रु पर्यंत जमा रक्कम.
किमान निश्चित पेन्शन देण्याची गॅरेन्टी सरकार ची असेल.
मासिक पेन्शन - योगदात्याचे वय, योगदानाचा कालावधी आणि योगदान केलेली रक्कम यावर अवलंबून असेल.
योगदानाची रक्कम खातेधारकाच्या बचत खात्यातून बँक द्वारा 'ऑटो डेबिट' सुविधेच्या माध्यमातून घेतली जाईल.
कोणतीही व्यक्ती एका बचत खात्याद्वारा ह्या योजनेसाठी पात्र ठरेल.
जर खातेधारकांनी 31 डिसेंबर 2015 रोजी या योजनेत सहभागी झाले असतील तर केंद्र सरकार द्वारा सर्व पात्र सबस्क्रायबर्सना (सबस्क्रायबर्स- योजनेचा लाभार्थी) 5 वर्ष्यासाठी एकूण योगदानाच्या 50% किंवा 1000 रु ह्या पैकी जी रक्कम असेल तितके योगदान देण्यात येईल.
आपली बँक शाखा किंवा बँक मित्र
यांच्याशी संपर्क साधाआणि योजनेसाठी अर्ज करा
ह्या योजनेचा लाभ घ्या.
जितकी लवकर गुंतवणूकीस सुरुवात, तितका अधिक फायदा
🔘 प्रधानमंत्री मुद्रा योजना
आपल्याला आपला
छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची समस्या देखील येत असेल तर आपण आपले
स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करु शकता. शिशु कर्ज:
शिशु कर्ज अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतची
कर्जे दिली जातात.
मुद्रा कर्जासाठी व्यवसाय कागदपत्रांचा पुरावा: प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी किंवा व्यवसायाचे अस्तित्व, पत्ता आणि मालकीची पुष्टी करणारे कोणतेही अन्य दस्तऐवज. व्यवसाय मालक, भागीदार इ. चे फोटो.
पंतप्रधान मुद्रा लोनसाठी अर्ज कसा करावा
आपली बँक शाखा किंवा बँक मित्र
यांच्याशी संपर्क साधा आणि योजनेसाठी अर्ज करा
ह्या योजनेचा लाभ घ्या.
विशेष सुविधा :
कमी व्याज दर
फक्त सवलत घेण्यासाठीची रक्कम भरा.
मुद्रा कार्ड ची सुविधा उपलब्ध
🔘 सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजनेत 'लॉकडाउन'मुळे बदल
पहा
सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे.'बेटी बचाओ-बेटी पढाओ' या अंतर्गत ही योजना सुरू केली होती. सध्याच्या बचत गुंतवणुकीमध्ये मुलींचं भवितव्य उज्वलतेकडं नेणारी ही एक उत्तम योजना आहे
सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारने वर्ष 2015 मध्ये लॉन्च केली होती. या माध्यमातून मुलींचं शिक्षण, लग्न आणि अन्य खर्चासाठी एक ठराविक रक्कम जमा केली जाऊ शकेल. अन्य योजनांच्या तुलनेत पाहायला गेलं तर या योजनेत जास्त व्याज मिळते. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत या योजनेवर वर्षाकाठी 7.6 टक्के दराने व्याज मिळेल.
सुकन्या समृद्धी योजना
मुलींच्या कल्याणासाठी प्रोस्ताहन देणे.
पालक हे मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षापर्यंत मुलीच्या नावे खाते उघडू शकतात.
जास्तीत जास्त कालावधी खाते उघडल्या पासून 15 वर्ष पासून ठेवी काढता येतील.
रोख / चेक / डिमांड ड्राफ्ट या प्रकारच्या ठेवीच्या पद्धती वापरू शकता.
🔘 प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत अपघातात मृत्यू पावल्यानंतर सुरक्षा दिली जाते.
ठळक वैशिष्टे
- रुपये ३३० वार्षिक हप्ता
- लाभार्थी वयोगट १८ ते ५०
- लाभ - मृत्यू झाल्यास २ लाख रुपये भरपाई
- अट - फक्त बँकेत खाते असणे आवश्यक कोणीही लाभ घेवू शकतात.
- एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी हि एक आयुर्विमा योजना आहे. दर वर्षी नूतनीकरण आवश्यक. बँका व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहयोगाने या योजनेचे परिचालन केले जाईल.
- १८ ते ५० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकेल. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जाईल.
- योजनेचा कालावधी दर वर्षी १ जून ते ३१ मे असा राहील व विमा हप्ता बँक खातात परस्पर नावे टाकला जाईल. पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मे पर्यंत देणे आवश्यक राहील. योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सरकार सुरवातीला ३ महिने पर्यंत वाढवू शकते.
- विमाधारकाचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाला तर वारसास रु. २ लाख भरपाई मिळेल.
- विमा हप्ता रो. ३३०/- प्रती व्यक्ती प्रती वर्ष राहील व बँक बचत खात्यात परस्पर नावे टाकला जाईल
- विमा धारकाने वय वर्ष ५५ पूर्ण केल्यावर / बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता नावे टाकण्यास पुरेशी शिल्लक नसेल तर / बँक खाते बंद केले तर विमा संरक्षण संपुष्टात येईल.
No comments:
Post a Comment
Please do not enter ant spam link in the comment box.