Sunday, June 27, 2021

ऑनलाईन शिक्षण पद्धत खूप प्रभावी ठरले आहे. तुम्ही सुद्धा जगातील सर्व प्रतिष्ठीत प्राध्यापक यांच्याकडून शिक्षण घ्या.

 




आजच्या युगात इंटरनेट सारख्या सुविधा सर्व घरात सहज उपलब्ध आहेत.कोविड-19 या आपत्कालीन परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण उपयोगात येत आहे.आज ऑनलाइन शिक्षण सर्वत्र अधिक लोकप्रिय आणि लोकप्रिय झाले आहे

ऑनलाईन शिक्षण हे असे माध्यम आहे ज्याद्वारे देशातील आणि जगाच्या कोणत्याही कोपर्यातून शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसह ऑनलाइन संपर्क साधू शकतात.

शिक्षक स्काईप, झूम इत्यादींद्वारे व्हिडिओ कॉल करतात आणि मुले लॅपटॉप किंवा संगणका वर शिक्षकांना पाहू आणि ऐकू शकतात, शिक्षक मुलांना शिकविण्यासाठी आपल्या संगणकावरील स्क्रीन शेयर करतात जेणेकरुन मुलांना उत्तम प्रकारे समजू शकेल

लॉकडाऊनच्या क्षणी जिथे सर्व शिक्षण केंद्रे बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे आज तिथे मूल घर बसल्या शिकू शकत आहेत, आज जगभरातील मुले ऑनलाइन शिक्षणाद्वारे सहजपणे अभ्यास करण्यास सक्षम आहेत. ऑनलाइन शिक्षण मिळविण्यासाठी चांगल्या आणि जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटीची आवश्यकता असते.आजच्या या कोरोनाच्या परिस्थितीत मुले शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेऊ शकत नाहीत, परंतु ऑनलाइन शिक्षणामुळे मार्ग सोपा झाला आहे.

ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय?

ऑनलाईन शिक्षण म्हणजे आपण जे शिक्षण आपल्या शिक्षकाकडून ब्लॅकबोर्ड आणि पुस्तकांच्या माध्यमातून शाळा किंवा महाविद्यालयाच्या वर्गात मिळवत होतो तेच शिक्षण आज आपण संगणक, मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या प्राप्त करतो यालाच ऑनलाईन शिक्षण म्हणतात.

कोरोना कालावधीत लॉकडाऊन लागले होते आणि म्हणून सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद होते तर या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण ची खूप गरज वाढली.

ऑनलाईन शिक्षण साठी तुम्हाला कश्याची गरज असते?

ऑनलाईन शिक्षण साठी तुम्हाला फक्त मोबाईल किंवा संगणक आणि इंटरनेट connection ची गरज असते

आणि ऑनलाईन lecture साठी झूम किंवा गूगल मीट अशे अँप्स वापरले जातात

ऑनलाईन शिक्षण चे फायदे :

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे खालीलप्रमाणे

  • ऑफलाइन शिक्षण साठी शाळा आणि महाविद्यालयात जाणे आवश्यक आहे. दररोज घराबाहेर जाण्यात वेळ, उर्जा आणि पैशाचे नुकसान देखील होते. घरी ऑनलाइन शिक्षण मिळवल्याने संसाधनांचा खर्च वाचतो आणि वेळ व शक्तीही वाचते.
  • जर ऑनलाईन वर्गाच्या वेळी विद्यार्थ्याला एखादा मुद्दा स्पष्टपणे समजला नसेल तर तो शिक्षकांना पुन्हा तो मुद्दा सांगण्यास सांगू शकतो. याशिवाय विद्यार्थ्याला कोणताही टॉपिक जर समजत नसेल तर तो रेकॉर्ड केलेल्या लेक्चर ला पुन्हा पाहू शकतो
  • ऑनलाईन शिक्षणाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की विद्यार्थी देशातील व परदेशातील कोणत्याही संस्थेचे शिक्षण मिळवू शकेल.
  • आपल्या अभ्यासक्रमामधून काही गोष्टी समजल्या नाहीत. अशा परिस्थितीत गुगलवर आम्ही सोप्या भाषेत शोधून या गोष्टी पाहू शकतो.
  • ऑनलाईन शिक्षणाद्वारेच विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास पूर्ण केला. घरातच शिक्षण मिळवून ती कोरोनाच्या धोक्यातून हि वाचली आणि शाळा व महाविद्यालयात जाण्याच्या त्रास व खर्च वाचला.
  • लॉकडाउन मध्ये कोरोना व्हायरस चा धोका नसतो.
  • शहरात मिळणारे दर्जेदार शिक्षण गावातील मुलांना देखील मिळत आहे.
  • ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांना अभ्यासात गोळी निर्माण होत आहे.

ऑनलाईन शिक्षण चे तोटे :

ऑनलाईन शिक्षणाचे तोटे खालीलप्रमाणे

  • ऑनलाईन शिक्षणाचं एक नुकसान असं आहे कि, आपल्या देशात बरीच विधार्थ्यंची आर्थिक परीरस्थिती खालावली असते, आणि म्हणून ते एवढा महाग मोबाईल, किंवा लॅपटॉप घेऊ शकत नाही. आणि म्हणून मागासलेल्या क्षेत्रात विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण पासून वंचित राहतात
  • कित्येकदा विध्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेत नाहीत
  • अशे बरेच भाग असतात जिथे नेटवर्क ला अडचण येते, अश्या वेळेस विद्यार्थ्यांना अडचण येत असते.
  • मोबाइल किंवा संगणक समोर जास्त बसल्याने मुलांना डोळ्याला आणि कानाला त्रास होऊ शकतो.
  • मोबाईल वर अभ्यास असल्यामुळे मुलांचं मन विचलित होऊ शकते.
  • ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची कमतरता निर्माण होते.
  • ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी काय करत आहे हे शिक्षकांना दिसत नाही. ज्यामुळे विद्यार्थी बेशिस्त होतात.
  • घरी बसून शिक्षण होत असल्याने ते मित्र मैत्रिणींना भेटू शकत नाही आणि यामुळे एकलकोंडे होण्याची भीती वाढते.

ऑनलाईन शिक्षण काळाची गरज आहे का ?

मित्रांनो कोरोना व्हायरस ने पूर्ण जगाची जीवनशैली बदलून ठेवली आहेत..

जागोजागी लॉकडाऊन होत आहे आणि म्हणून शाळा आणि महाविद्यालये सुद्धा बंद आहे.

आणि अश्या परीस्थित अभ्यासक्रम सुद्धा थांबवता येणार नाही म्हणून ऑनलाईन शिक्षण हा एकच पर्याय वाचला आहे.

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे सुद्धा आपण पाहिले.

वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला भरपूर माहिती मिळते.

ऑनलाईन माहितीचा फायदा म्हणजे एखादी गोष्ट समजली नाही तर ती आपण परत परत पाहून ऐकून
समजून घेऊ शकतो.

ऑनलाईन शिक्षणाचे फायदे सुद्धा आपण पाहिले

वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला भरपूर माहिती मिळते. ऑनलाईन माहितीचा फायदा म्हणजे एखादी गोष्ट समजली नाही तर ती आपण परत परत पाहून ऐकून
समजून घेऊ शकतो.

कोरोना चा प्रसार वाढल्यामुळे सगळी कडे बंदी होत आहे, पण यात मात्र शिक्षण थांबवता येणार नाही म्हणून आता ऑनलाईन शिक्षण काळाची गरज होत चालले आहे.

No comments:

Post a Comment

Please do not enter ant spam link in the comment box.